नाशिक अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशन - म्हणजेच नाडा - ७०

नाशिक अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशन [नाडा-७०] ही संस्था दि.१९७० साली स्थापन झाली असून ही संस्था धर्मदाय आयुक्‍त यांचेकडे ट्रस्ट डिड अ‍ॅक्ट व सोसायटी अ‍ॅक्टमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. नाडा या संस्थेच कार्यक्षेत्र नाशिक जिल्हा आहे. नाडा ही आगळी वेगळी संघटना जी कृषि विक्रेत्याचे हिताचे रक्षण करण्याबरोबरच शेतकरी बांधवासाठी विविध योजना राबवत असते. नाडा ह्या संस्थेचे आजतागायत एक हजार नऊशे [१९००] सभासद आहेत. व अजुनही सभासद वाढत आहेत.

नाडा ह्या संस्थेने आतापर्यंत १२५ पेक्षा जास्त शेतकरी मेळावे भरविले आहेत. आमच्या ह्‍या संस्थे मार्फत जिल्ह्‍यातुन वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन त्यांना शास्त्रशुध्द रित्या नविन तंत्रज्ञातुन शेती कशी फुलवता येईल व जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल या बाबत मेळ्यापासुन मार्गदर्शन करणेत येते. अनेक तज्ञ कृषि विचारवंताना आमंत्रित करुन शेतकरी बंधुसाठी सतत प्रबोधनाचे कार्य करीत आहे. सेल्स टॅक्सचा प्रश्न असो, मार्केट मधील अडचणी असोत. प्रत्येक वेळी ही संघटना शेतकरी बंधुच्या मागे सतत उभी आहे. एवढेच नव्हे तर मागील वर्षी आलेल्या मुंबई परिसरातील पुरग्रस्तांसाठी या संघटनेने जास्त नुकसान झालेल्या ५ गांवामध्ये समक्ष जाऊन भाजीपाला, धान्य, पाण्याच्या बाटल्या व आवश्यक ती स्टीलची भांडी यांचे वाटप करण्यात आले आहे. गुजराथ येथील भूज कच्छ येथे असलेल्या भुकंपग्रस्तांना निधी जमा करुन जिल्हाधिकारी यांचेकडे धनादेश देण्यात आला. अशा प्रकारे ह्या संस्थेचे कार्य चालू आहे.

दरवर्षीच्या गणेश उत्सव व दिपावली सणात अनाथ विद्यार्थ्यांसाठी सुध्दा ही संघटना काम करीत आहे. अनेक तालुक्यात कृषि, शैक्षणिक असे मेळावे भरविले आहेत.

नाशिक जिल्ह्‍यातील सर्वात जास्त क्षेत्र हे द्राक्ष बागेचे, कांदयांचे तसेच भाजीपाल्याचे क्षेत्र आहे. त्याच बरोबर आपणास माहितच आहे की, नाशिक जिल्हा हा आशिया खंडात कृषिक्षेत्रात अग्रेसर असुन द्राक्ष, कांदा, डाळींब, ऊस, भाजीपाला असे नगदी पिके घेतली जातात व परदेशात निर्यात केली जातात. अशा भागातील सर्व शेतकारी बंधुना ही संघटना वेळोवेळी त्यांना आवश्यक माल व तोही वेळेवर पुरविण्यास तत्पर आहे.

नाडा हस्ते संस्थेमार्फत जिल्ह्‍यातील सभासदांना शासनाचे येणाऱ्या नविन नियमावली, कायदे याची त्वरीत माहिती पुरविली जाते. व त्यांची योग्य ती दखल आमचे विक्रेते घेत असतात. त्याच बरोबर खरीब व रब्बी हंगामात आमचे विक्रेते उत्सव व चांगल्या प्रतीचे बियाणे, किटकनाशके व रा.खते शेतकरी बांधवांना पुरतात.

नाडा ही महाराष्‍ट्रातील ऐकमेव असोसिऐशन आहे की हस्त संस्थेमार्फत जि.प.कृषि विभागाने दिलेल्या नमुन्याचे अभिलेक स्टॉक रजिस्टर व मासिक अहवाल विक्रेत्यांना वाजवी दरात विक्रीकेली जाते. त्याच बरोबर बियाणे, किटकनाशके, रा.खते नविन परवाना नुतनीकरणासाठी लागणारे आवश्यक त्या नमुण्यात फॉर्म ह्‍या कार्यालयातून विक्रेत्यांना दिले जातात. त्याच बरोबर बियाणे सोर्स सर्टिफिकेट (कंपनी यादी) किटकनाशके उगमप्रमाणपत्र व रा.खते ओ फॉर्म सुध्‍दा नाडा कार्यालयातून विक्रेत्यांना दिले जातात. जिल्ह्‍यातील सर्व सभासदांची नोंद एकाच ठिकाणी ठेवले कामी, संगणकाची व्यवस्था केली असून, रोजच्या रोज अपडेट करणेत येते. त्याच बरोबर नाडाचे कार्यालय, कृषी उत्पन बाजार समिती संकुलात दोन गाळे असून कार्यालयातून नविन दुकानदारास योग्य ते मार्गदर्शन दिले जाते.

असे काम करणारी कृषि विक्रेत्यांची महाराष्‍ट्रातील ही एकमेव आगळी वेगळी संघटना आहे. नाडाने वर्षाचे सुरुवातीपासून अविरत कार्य करुन रक्कम जमा केली व कार्यालयासाठी कृषि उत्पन्‍न बाजार समिती, व्यापारी संकुलामध्ये दोन गाळे घेऊन नाशिक अ‍ॅग्रो डिलर्स असोसिएशन [नाडा-७०] ही संस्था थाटाने कार्यरत आहे.

@copyright 2015 all rights reserved | design & developed by Xposure Infotech